Thursday 11 September 2014

50 लाख गुगल पासवर्ड चोरी, आपला करा चेक -50 Lakh Gmail hacked

50 लाख गुगल पासवर्ड चोरी, आपला करा चेक -50 

Lakh Gmail hacked, Anti-Hacker Tool Kit, Gmail Hacks,Check Gmail Hacks


न्यू यॉर्क :  तुमच्यासाठी एक चांगली आणि एक वाईट बातमी. वाईट बातमी ही आहे की रशियाच्या एका हॅकर्सने ५० लाख गुगल अकाउंट्सचे युजरनेम आणि पासवर्ड ऑनलाइन केले आहेत. यात तुमचाही युजरनेम असू शकतो. चांगली बातमी ही आहे की, ऑनलाइन केल्याने तुम्ही तुमचा युझरनेम आणि पासवर्ड चेक करू शकतात आणि त्वरित बदलू शकतात.
कुठे टाकला गेला हा डाटा 
रशियाच्या एक बिटकॉइन सिक्युरिटी फोरम btcsec.com वर 49.3 लाख यूझरनेम-पासवर्डचा डेटाबेस पोस्ट करण्यात आला आहे.  हा डेटा पोस्ट करणारा यूझर 'tvskit' ने दावा की यातील 60 टक्के माहितीद्वारे तुम्ही लॉन इन करू शकतात.
काय म्हणणे आहे एक्सपर्टचे 
साइबर एक्सपर्ट्सचे म्हणणे आहे की, यामुळे तुम्ही घाबरून जाण्याची गरज नाही. या डेटाचे परिक्षण केलेल्या डेन्मार्कच्या साइबर सिक्युरिटी कंपनी CSIS चे चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर पीटर क्रूस ने सांगितले की, ' आम्ही 60 टक्के लॉग-इन करण्याचा दावा मान्य करत नाही. परंतु, या डाटातील मोठा भाग योग्य आहे.  CSIS च्या रिसर्चर्सनुसार मागील लिक्सचा इतिहास पाहता हा डाटा ३ वर्ष जुना असू शकतो.
गूगलने दिला नकार 
गूगलने आपल्या सर्वरमधून डाटा चोरी होण्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे. रशियाच्या एका टेक्नॉलॉजी वेबसाइटने सांगितले की, यूझरनेम-पासवर्डमध्ये जास्त करून फिशिंग स्कॅम आणि दूसऱ्या लीकमधून चोरी गेलेल्या डाटापैकी सामाविष्ट आहे. यात गूगल सर्वर हॅकचा कोणताही प्रकार नाही.
सेफ होऊ शकते तुमचे गूगल अकाउंट 
एक्सपर्ट्सनुसार यात जास्त करून असते जीमेल खाते आहे, की त्याद्वारे युझर दुसऱ्या साइटवर लॉगइनक करतो. पण बहुतांशी युझर आपला पासवर्ड बदलून वापर करतात. उदा.  माझे गूगल अकाउंट xyz@gmail.com आहे आणि गूगलसाठी पासवर्ड abcdefgh आहे. मी दुसऱ्या एका साइटवर लॉग-इनसाठी गूगल अकाउंट xyz@gmail.com ची वापर केला. पण पासवर्ड stuvwxyz ठेवला आहे. तेव्हा जास्त शक्यता ही आहे की डाटामध्ये xyz@gmail.com सह पासवर्ड stuvwxyz दाखविण्यात आला आहे.
कसे चेक करणार 
तुम्ही 5 सेकंदात चेक करू शकतात. तुमचे गूगल अकाउंटसुद्धा यात सामील आहे की नाही हे पाहण्यासाठी  तुम्ही securityalert.knowem.com किंवा isleaked.com/en वर आपला जीमेल आयडी टाइप करून चेक करू शकतात. एक्सपर्ट्सने इशारा दिला की यूझर्सने आपला पासवर्ड बदलावा.
DD
DD

This is a short biography of the post author. Maecenas nec odio et ante tincidunt tempus donec vitae sapien ut libero venenatis faucibus nullam quis ante maecenas nec odio et ante tincidunt tempus donec.

No comments:

Post a Comment